पराभवानंतर पहिली प्रतिक्रिया ; आढळरावांनी पराभवाचे सांगिलते ‘हे’ कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंचर प्रतिनिधी | शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने जातीचे राजकारण केले. लोकांनी भावनिक होऊन संभाजी महाराजांच्या भूमिकेला मतदान केले त्यामुळे माझा पराभव झाला असे आढळराव पाटील यांनी म्हणले आहे. दर रविवारी भरणारा आढळराव पाटील यांचा जनता दरबार आज देखील भरला होता. यावेळी हजारो नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते.

तुम्ही कोणावर तरी खर प्रेम करत असाल तर या गोष्टी करू नका

मी लढवय्या कार्यकर्ता आहे. मला राज्यसभेची संधी दिली तरी मी राज्यसभा घेणार नाही. चौथ्यांना निवडून आलो असतो तर शिरूर लोकसभा मतदारसंघाला मंत्रिपद मिळाले असते. मात्र राष्ट्रवादीच्या कुटील राजकारणामुळे हि संधी हुकल्याचा जनतेच्या मनात राग आहे. त्यामुळे या पराभवाचा वचपा जनता आंबेगाव मध्ये काढणार आहे असे आढळराव पाटील म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानातून त्यांनी अप्रत्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावरच निशाणा साधला आहे.

कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?

जनमताचा कौल उदार अंतकरणाने स्वीकारतो आणि १५ वर्षांपासून भरत आलेला माझा जनता दरबार इथून पुढे देखील असाच भरत राहील अशी घोषणा करतो असे आढळराव पाटील म्हणाले आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटीलयांचा राष्ट्रवादीचे उमेदवार अभिनेते अमोल कोल्हे यांनी ५८ हजार मतांनी पराभव केला आहे.

उदयनराजेंकडून पराभूत झालेले नरेंद्र पाटील मोतोश्रीवर

 

हे देखील वाचा 

शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडल्या दिवशीच हॅलो महाराष्ट्र न्यूज पोर्टलने आपल्या अधिकृत संकेत स्थळावरून आढळराव पाटील यांचा पराभव होईल असे वृत्त दिले होते. निकाला नंतर हे सिद्ध  झाले आहे कि हॅलो महाराष्ट्र च्या टीमने आढळराव पाटलांच्या पराभवाचे केलेले निदान तंतोतंत खरे होते. आपली खात्री पटण्यासाठी खाली २९ एप्रिल दिवशी प्रकाशित केलेल्या बातमीची लिंक देत आहे.

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

Leave a Comment