संप मागे घेतला नाही तर मी स्वतः एसटी चालवेन आणि…; चंद्रकांत पाटलांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 2 महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून जनतेचे मात्र हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना येत्या दोन दिवसात जर एस टी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला नाही, तर मी स्वतः बस चालवत आपल्या मतदार संघातील एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचा इशारा शिवसेनेचे मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

एसटीच्या संपात उभी फूट पडली असून एसटी कर्मचारी वेतन संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र तरीही काही कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या कितीही महत्त्वाच्या असल्या तरी त्यांनी आता जनतेचा विचार करुन, ताबडतोब बससेवा सुरू करावी.

एसटी सेवा बंद असल्याने सामान्य नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी जर येत्या दोन दिवसात बससेवा सुरू केली नाही तर मात्र मी स्वतः बस चालवणार आहे. माझे कार्यकर्ते देखील आपल्या मतदारसंघात बस सेवा सुरू करतील, असा इशारा आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे

Leave a Comment