माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले; बंडखोर शिवसेना आमदाराचा धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंडखोर आमदारांच्या यादीत असलेले अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी धक्क्यादायक खुलासा केला आहे. मला अटॅक आला नव्हता. माझ्या दंडावर बळजबरीने इंजेक्शन टोचले असा आरोप त्यांनी गुजरात पोलिसांवर केला आहे.

नितीन देशमुख नागपुरात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी सांगितले की, मला हृदय विकाराचा त्रास झालेला नाही. २० ते २५ जणांनी पकडून मला इंजेक्शन दिले. ते कशाचे होते, याची कल्पना देखील देण्यात आली नाही. हे माझ्या शरीरावर चुकीची प्रक्रिया करण्याचे षडयंत्र होते, असा आरोपही नितीन देशमुख यांनी केला.

मी शिवसैनिक आहे आणि कायम शिवसैनिकच राहणार आहे. मी शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंचाच शिवसैनिक आहे. मी आलो बाकीचेही येतील असा दावा त्यांनी यावेळी केला. दरम्यान, काल च देशमुख यांच्या पत्नीने ते हरवल्याची पोलीस तक्रार दाखल केली होती

Leave a Comment