Wednesday, February 8, 2023

मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार , कोर्टाने काही आदेश देऊ द्या – संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडवरुन सुरु असलेलं राजकारण संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्य सरकारने कारशेड कांजूरमार्गच्या जागेवर बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उच्च न्यायालयाने कांजूरमार्गच्या कारशेडवर स्थगिती आणली. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. दरम्यान, “मेट्रो कारशेड कांजूरमार्गलाच होणार. तुम्ही काहीही करा, कितीही अडथळे आणा. कोर्टाने काहीही आदेश देऊ द्या. कांजूरमार्गलाच कारशेड होईल. कांजूरचे योगदान मेट्रोसाठी वेगळे आहे”, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.

एकशे पाच आमदारांना घरी बसवले आहे. पुढच्यावेळी विधानसभेत शिवसेनेचे 105 आमदार असतील”, असा दावा राऊत यांनी केला. पुढील लढाई मुंबई महानगरपालिका आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत ज्यांनी शिवसेनेचा भगवा उतरवा, असं आव्हान दिलं आहे, त्यांच्या छाताडावर उभं राहून भगवा फडकवून दाखवायचा आहे. असेही ते म्हणाले. ईशान्य मुंबईत शिवसेनेची ताकद राहिली आहे. विक्रोळी मतदारसंघात सहा जागा जिंकायचं आहे”, असा एल्गार संजय राऊत यांनी पुकारला.

- Advertisement -

कोरोना संकट काळत शिवसेना खंबीरपणे उभी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझे कुटुंब, माझी जबाबदारी योजना अंमलात आणत काळजी घेण्याच आवाहन केलं. मुख्यमंत्र्यांनी गर्दीत कार्यक्रम करु नका, असं सांगितलं आहे. राज्यात रक्त कमी पडत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात रक्तदान मोठ्या प्रमाणात सुरु झालं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’