सेलिब्रिटींना मेंदू आहे का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे लोकांना कळतंय पण तुम्हाला नाही; संजय राऊत भडकले

मुंबई । मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७४ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहाना हीने ट्विट केल्यानंतर देशभरातील अनेक कलाकार, खेळाडू अशा सेलिब्रिटिंनी सरकारच्या सुरत सूर मिसळत तिला प्रत्युत्तर दिले. भारतातील घडामोडींमध्ये नाक खुपसू नये, असा एका सुरात सर्वानी तिला सल्ला दिला. याच मुद्द्यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी सेलिब्रिटिंवर निशाणा साधला. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारवरही सडकून टीका केली.

“सेलिब्रिटींना मेंदू नाही का? एरव्ही असतो ना! तुम्हाला सेलिब्रिटी कुणी केलं? या रस्त्यावरच्या लोकांनीच केलं ना. या गरिबांना कळतं, ते तुम्हाला कळत नाही का? तुम्हाला कोण वापरून घेतंय हे तुम्हाला कळत नाही का?”, असे सवाल संजय राऊत यांनी केले. आंदोलन होतच असतात असं म्हणत पंतप्रधांनांनी शेतकऱ्यांचे खच्चीकरण करणं हे देशाच्या परंपरेला शोभणारं नाही. भाजप हा पक्ष आंदोलन करूनच पुढे आला. भाजपने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन केलं. त्यांच्या सायबर फौजांनी बदनामी केली”, असा दावा संजय राऊत यांनी केला.

आज राज्यसभेत पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यावरून शरद पवार यांच्या भूमिकेबाबत नाव न घेता टिप्पणी केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यूटर्न घेतला, असं म्हटलं. पण शरद पवार यांनी आपल्या भूमिकेतून यूटर्न घेतलेला नाही”. “आंदोलन मागे घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे आलं पाहिजे. शेतकरी अज्ञांनी आहेत. शेती, पीक हेच त्याचं जग आहे. केवळ आव्हान करून होत नाही, शेतकऱ्यांसोबत चर्चा करुन ऊंची कमी होणार नाही, ती वाढेल”, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

You might also like