गुलाबरावांचा जुलाबराव होईल, बेईमानी पचणार नाही; संजय राऊत कडाडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गुलाबरावांचा जुलाबराव होईल. बंडखोरांना बेईपानी पचणार नाही. 50 खोके तुम्हाला पचणार नाहीत. खोके घेतले म्हणजे झोप[ लागतेच असं नाही असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटातील बंडखोर आमदारांवर जोरदार हाल्लाबोल केला. संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असून शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

2019 ला अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात ठरलं होत की अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं पण नंतर निवडणुकीनंतर अमित शाह म्हणाले शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही तेव्हा यांच्यातील कोणीही मायचा लाल बोलला नाही, त्यांच्यातील आत्मा स्वाभिमानाने जागा झाला नाही. तेव्हा तुम्हाला हिंदुत्त्व आठवलं नाही का असा तिखट सवाल संजय राऊत यांनी बंडखोर आमदाराना केला

एकनाथ शिंदे दिल्लीला हायकमांडला भेटायला गेले आहेत. त्यांचे हायकमांड दिल्लीत असेल पण आमच हायकमांड मातोश्री आहे, शिवसैनिकांचे हायकमांड मातोश्री आहे. ज्या भाजपने तुमच्याशी गद्दारी केली त्यांचं भाजपच्या लोकांना तुम्ही हायकमांड मानत असाल तर जनता हे मान्य करणार नाही. असे राऊत यांनी म्हंटल.

Leave a Comment