बिहार निवडणुकीसाठी शिवसेना -राष्ट्रवादीमध्ये खलबते ?? राऊत -पवार भेटीने चर्चांना उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही बिहार मध्ये निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीत भाजपला बिहारमध्ये सत्तेपासून दूर ठेवणं हे एकमेव ध्येय समोर आहे. त्यातच आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसवा शरद पवार यांच्यात काल झालेल्या भेटीने पुन्हा खळबळ उडाली असून बिहार विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत राजकीय खलबते झाल्याच समजतंय. संजय राऊत यांनी स्वतः याबद्दल ट्विट केलं आहे.

देशाचे नेते शरद पवार यांना भेटलो. महाराष्ट्र आणि देशातील अनेक राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाली. पवार यांच्याशी होणारा संवाद नेहमीच मार्गदर्शक असतो असे ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांच्या भेटीत विशेषत: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बरीच चर्चा झाली. भाजपाने बिहार विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. या राज्यात पुन्हा आपलीच सत्ता येईल, असा दावा भाजप नेते ठोकू लागले आहेत. त्यामुळे भाजपाला रोखण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी प्रमाणे बिहारमध्ये काँग्रेसला सोबत घेऊन आघाडी होऊ शकेल का, यावर या दोन नेत्यांनी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना आणि सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी सखोल चर्चा केली. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी उद्योग, व्यवसाय सुरू राहिले पाहिजेत. यासाठी महाविकास आघाडीकडून दमदार पाऊल उचलावित. तसेच राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा कसा मिळेल व विकासकामे पुन्हा सुरू केली जावीत, याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment