Thursday, March 30, 2023

भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करतायत ; राऊतांचा आरोप

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला जास्तीत जास्त आरोग्य सुविधा पुरवाव्यात अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मोदींच्या मनात महाराष्ट्रा बद्दल आकस नसेल देखील परंतु भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप  त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसी कोणालाही कमी पडणार नाही असं म्हंटल मग महाराष्ट्राला का कमी पाडल्या जातायत.? असा सवाल संजय राऊत यांनी केला. मग कुणी झारीतले राजकीय शुक्राचार्य आहेत का? जे महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्राच्या लोकांच्या जीवाशी खेळताहेत. संकटाच्या प्रसंगी कुणी वैर घेऊन राजकारण करू नये. असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला.

- Advertisement -

दरम्यान, केंद्र सरकारकडून इकडून तिकडून पैसा गोळा करून तो बंगालमध्ये खर्च केला जातोय.  केंद्र सरकारने राज्य सरकारचे देणे असलेला पैसा लवकर द्यावा अशी मागणीही त्यांनी केली. सध्याच्या घडीला महाराष्ट्राला पैशांची जास्त गरज आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

यावेळी त्यांनी अमित शहा यांच्या सरकार पडण्याच्या विधानाचा देखील समाचार घेतला. अमित शाहा यांनी महाराष्ट्रातील सरकार आपल्या ओझ्याने पडेल असे विधान केले होते. त्यास प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी अमित शहा याना टोला लगावला. सरकारचे ओझे वाढल्यावर अमित शाहा यांना कळवू, असा टोला त्यांनी लगावला.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.