मी ईडीची नोटीस शोधतोय पण सापडत नाही, बहुतेक भाजपच्या ऑफिस मध्ये अडकली असेल ; राऊतांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मंगळवार २९ डिसेंबर रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी या विषयावर भाष्य करताना भाजपला टोला लगावला आहे.

मी कालपासून ईडीची नोटीस शोधतोय पण सापडत नाही, बहुतेक भाजपच्या ऑफिस मध्ये अडकली असेल आता मी माझा माणूस भाजपच्या आँफिसमध्ये पाठवला आहे”, असा टोला संजय राऊत यांनी लागवला आहे. हे सर्व राजकारण ज्यांना करायचं आहे त्यांना करुद्या, असंही ते म्हणाले. ईडीची नोटीस याबद्दल शिवसेना भवनात दुपारी होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर बोलणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

वर्षा राऊत यांना नोटीस का?

पीएमसी बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीसाठी वर्षा राऊत यांना 29 डिसेंबर रोजी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बँकेतील खात्याशी संबंधित कागदपत्रं घेऊन कार्यालयात येण्यास नोटिशीत सांगितलं आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment