माफी मागा, अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार; राऊतांची चंद्रकांत पाटलांना नोटीस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक घमासान रंगल होत. हा वाद आता आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे असून एका प्रकरणात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांनी वकिलांमार्फत नोटिस पाठवली आहे. माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’त प्रसिद्ध झालेल्या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी आपल्याबाबत चुकीची माहिती दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. पत्नी वर्षा राऊत यांच्या झालेल्या ईडी चौकशीत चंद्रकांत पाटील यांनी आपला चुकीचा संदर्भ जोडल्याचं राऊतांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी एक ट्वीट केलं आहे.

माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिपण्णा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाईन, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी ‘सामना’ला पत्रं पाठवून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर आरोप केले होते. राऊत यांनी हे आरोप दळभद्री असल्याचं सांगत चंद्रकांतदादांवर सव्वा रुपयांचा दावा लावणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. चंद्रकांतदादा हे सव्वा रुपयावालेच आहेत, असा चिमटाही राऊत यांनी काढला होता.

Leave a Comment