Monday, February 6, 2023

संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात गुप्त भेट?? महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप ??

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांची गुप्त घेतल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेना उधाण आले आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात दोन्ही नेत्यांची भेट झाली. या दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत 2 तास चर्चा केल्यानंतर राऊत लगेच शरद पवारांना भेटायला गेले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात दिल्लीत गुप्त भेट झाली. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार का अशी शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या संदर्भात भाजपाचे विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या भेटीबाबत मोघम प्रतिक्रिया दिली आहे. तसेच ही भेट राजकीय नसावी, तर ती सदिच्छा भेट असावी, असा दावा करत आपल्याला याबाबत काही माहिती नाही असं दरेकरांनी म्हंटल.