हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, संजय राऊतांचे भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आव्हान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील खडाजंगी संपता संपेना. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा यांना वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

संजय राऊत नंदूरबार येथे म्हणाले, चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, त्यांना जर शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्रातील समस्यांवर चर्चा झाली. त्यामुळे या भेटीवर राजकारण करण्याची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाबाबत आता राज्याची भूमिका राहिलीच नाही. आता केंद्रालाच भूमिका घ्यावी लागणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली आहे, असं ते म्हणाले.

Leave a Comment