लज्जास्पद! बीडमध्ये बलात्कार पीडितेलाचं गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेचा ठराव

बीड । बीडमध्ये (Beed) एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील (Georai) पाचेगावमध्ये अजब प्रकार घडला आहे. बलात्कार पीडितेला (Rape Victim) गावातून हद्दपार करण्याचा ग्रामसभेत (Gram Panchayat) चक्क ठराव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या ठरावावर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तबही केले आहे.

यापेक्षाही आणणारी बाब म्हणजे, गावकऱ्यांनी थेट पोलीस अधीक्षकांकडेही या महिलेला गावबंदी करावी यासाठी निवेदन दिले आहे. या संतापजनक प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात काय चालले आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

५ वर्षांपूर्वी या महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा देण्यात आली. मात्र त्यानंतर या पीडित महिलेच्या मुलीवरही अत्याचार करण्यात आला. आणि हे प्रकरण दाबण्यासाठीच आपल्यावर गाव सोडण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like