Big Basket च्या 2 कोटी युझर्सचा डेटा गेला चोरीला, 30 लाख रुपयांना येथे विकला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली | ग्रॉसरी ई-कॉमर्स (e commerce) कंपनी असलेल्या बिग बास्केट (Big Basket) च्या यूजर्सचा डाटा लीक झाला असल्याची शक्यता आहे. सायबर इंटेलिजेंस कंपनी Cyble च्या मते, डाटा लीक झाल्यानंतर सुमारे 2 कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला आहे. एका हॅकरने बिग बास्केटशी संबंधित डेटा 30 लाख रुपयांना विकण्यासाठी ठेवला आहे. कंपनीने बंगळुरूच्या सायबर क्राइम सेलमध्ये पोलिस तक्रार दाखल केली असून सायबर एक्सपर्ट या दाव्याचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.

Cyble च्या रिसर्च टीमने माहिती दिली
Cyble यांनी त्यांच्या एका ब्लॉगमध्ये लिहिले की, ‘आमच्या रिसर्च टीमने त्यांच्या रूटीन वेब मॉनिटरिंगमध्ये आढळले की सायबर क्राइम मार्केटमध्ये बिग बास्केटचा डेटा 40,000 डॉलर मध्ये विकला जात आहे, ही डेटा बेस फाइल 15GB आहे ज्यामध्ये जवळपास 2 कोटी यजूर्सचा डेटा आहे.

पर्सनल डिटेल्सची चोरी
या डेटामध्ये नाव, ई-मेल आयडी, पासवर्ड हॅश, कॉन्टॅक्ट नंबर, पत्ता, जन्म तारीख, लोकेशन आणि आयपी ऍड्रेस समाविष्ट आहेत. Cyble ने येथे पासवर्ड नमूद केला आहे ज्याचा अर्थ वन-टाइम-पासवर्ड आहे, जो SMS द्वारे प्राप्त होतो जेव्हा युझर लॉग इन करतो तेव्हा प्रत्येक वेळी तो बदलत असतो.

कंपनीने निवेदन जारी केले
बिगबास्केटने एका निवेदनात म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी आम्हाला संभाव्य डेटा चोरी बद्दल माहिती मिळाली. आम्ही त्याचे मूल्यांकन करू आणि या दाव्याची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न करीत आहोत. याबाबत आम्ही बेंगळुरूच्या सायबर क्राइम सेलकडे तक्रार देखील केली आहे.

30 ऑक्टोबर रोजी डेटा चोरीला गेला
Cyble असा दावा करतात की, ही डेटा चोरी 30 ऑक्टोबर 2020 रोजी झाली होती, त्याबद्दल बिग बास्केटच्या मॅनेजमेंटला सांगितले गेले होते. सायबले म्हणतात की, 31 ऑक्टोबर रोजी बिगबास्केटमध्ये देता चोरी झाली आहे की नाही याची संपूर्ण चौकशी झाली होती, त्यानंतर बिगबास्केट मॅनेजमेंटला 1 नोव्हेंबरला त्याविषयी माहिती देण्यात आली होती.

या कंपन्यांचे पैसे आहेत
बेंगळुरूची कंपनी असलेल्या Big Basket कडे Alibaba Group, Mirae Asset-Naver Asia Growth Fund आणि UK गव्हर्नमेंट CDC ग्रुपने पैसे गुंतवले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment