धक्कादायक ! गतीमंद युवतीवर ७० वर्षीय वृद्धाचा अत्याचार

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव तालुक्यातील आदिवासी ग्राम इस्लामपूर शिवारात निवासाला असलेल्या गतीमंद युवतीवर सात महिन्यापासून अत्याचार सुरु होते. यामधून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतर खाजगीरीत्या गर्भपात करून पाच ते सहा महिन्याच्या अर्भकाला जाळल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. वडोदा तालुका मुक्ताईनगर येथील देविदास ओंकार बोंबटकार यांचे तालुक्यातील इस्लामपूर शिवारात शेत आहे.

आरोपी देविदास बोंबटकार यांनी या शेताच्या बाजूला असलेल्या कुटुंबातील १९ वर्षीय युवतीवर सप्टेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत शारीरिक अत्याचार केला. त्यामुळे या पीडितेला गर्भधारणा झाली .त्यानंतर तिला खाजगीरित्या औषध देऊन बळजबरीने तिचा गर्भपात करण्यात आला. या नवजात अर्भकाला आरोपी देविदास बोंबटकार व सुभाष मानसिंग सस्त्या या दोघांनी जाळून टाकले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सचिन काकडे यांनी १८ जून रोजी रात्री उशिरा जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनमध्ये कलम ३७६ (२) (एल)(एन) ३१५ व ३१८ कलमान्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना २२ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश आडे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

You might also like