धक्कादायक : माण तालुक्यात पत्नीच्या मृत्यूनंतर पतीचेही निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

माण तालुक्यातील वरकुटे- मलवडी येथे पत्नीच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी (रक्षाविसर्जन) पतीचे निधन झाले आहे. पती- पत्नीच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पत्नी सुभद्रा पडळकर (वय- 85) हिच्या निधनानंतर पती शंकर पडळकर (वय-90) यांचेही निधन झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी वरकुटे – मलवडी ता.माण येथील श्री शंकर पडळकर (वय- 90) हे गेले अनेक वर्षे आजारी पडले होते. त्यांच्या पत्नी सुभद्रा पडळकर (वय- 85) या त्यांची सेवा करत होत्या. दुर्दैवाने त्या गेल्या आठवड्यात आजारी पडल्या होत्या. त्यांच्यावर येथील स्थानिक दवाखान्यात उपचार सुरू होते. वयाच्या मानाने शरीर उपचारासाठी योग्य अशी साथ देत नव्हते. उपचारादरम्यान त्यांचे बुधवार (दि. 1) सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता निधन झाले. शुक्रवार (दि.3) रोजी पत्नी सुभद्रा यांचा रक्षाविसर्जन विधीचा कार्यक्रम होता. यावेळी सर्व नातेवाईक, समाजबांधव, मित्रमंडळी उपस्थित होते. पंरतु पती शंकर पडळकर हे आजारी असल्याने त्यांना रक्षाविसर्जन कार्यक्रम स्थळी नेण्यात आले नव्हते.

मात्र पिंडदानाच्या वेळी कावळ्याने विधी सूरु असतानाच पिंडींला शिवले होते. कावळ्याने पिंडींला शिवल्याने उपस्थिंताच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. सर्व विधी पार पडल्यावर आलेले नातेवाईक पती शंकर पडळकर यांना भेटून जाऊ लागले होते. पत्नी वियोगाने व्याकूळ झालेल्या पतीने काही वेळातच आपले प्राण सोडले. त्यांच्या निधनाने वरकुटे – मलवडी येथे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात दोन मूले, दोन मूली, सुना, नांतवडे असा परिवार आहे. रविवार (दि. 5) सप्टेंबर रोजी सकाळी 8 वा. वरकुटे – मलवडी येथे रक्षाविसर्जन आहे

Leave a Comment