धक्कादायक ! केंद्रातील आणि राज्यातील मंत्र्यांच्या मतदारसंघात रस्त्याअभावी खाटेवरुन न्यावा लागला चिमुकल्याचा मृतदेह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – राज्य सरकार व केंद्र सरकारने ग्रामीण भागातील रस्ते विकासासाठी करोडीचा निधी उभारला असुन मोठं मोठी शहरे या कोरोडो रुपये खर्च करून काम करण्यात येत आहेत. मात्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण झाल्यावर आजघडीला देखील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार या दोन्ही मंत्र्याच्या मतदार संघातील अनेक लहान सहान वाडी वस्त्यांवर अजुन ही मूलभूत गरजा सर्व सामान्य जनतेला मिळाल्या नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील उपलीं ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या वाघदावाडी येथील चार दिवसा पूर्वी वळण रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला होता. वाघदावाडी ला जाण्यासाठी रस्ता नसल्याने चक्क मृतदेह खाटे वरून नेण्याची वेळ कुटुंबियांवर आली आहे. वाघदावाडी गावाची लोकसंख्या तीनशे पेक्षा जास्त असूनही या वाडी वर पिण्याच्या पाण्याची सोय नाही. नागरिकांना येण्या जाण्या साठी रस्ता नसल्याने रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी खाटेचां वापर करावा लागतो. पावसाळ्यात महिला, लहान मुले वयोवृद्ध व्यक्तींना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता अपघातात मृत पावलेल्या तुषार विठल महेर या मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठी कुटुंबीयांना खाटेचां आधार घावा लागला आहे. तुषार महेर या मुलाच्या कुटुंबातील तीन सदस्याचा रस्ता नसल्याने मृत्यू झालेला आहे. यातील एकाला सर्प दंश नंतर वेळेवर रुग्णालयात नेता आले नाही तर कुटुंबातील दोघांनी विष प्राशन केले होते, वेळेवर रुग्णालयात पोहचविता न आल्याने त्याचाही मृत्यू झाला होता. असा त्रास वाघदावाडी चे नागरिक सहन करीत आहे. प्रशासन व पुढाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

https://twitter.com/AurangabadHello/status/1431578683475644417?s=08

घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, जिल्ह्याभरात संतापाची लाट –
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात झालेल्या या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून जिल्ह्याभरात संतापाची लाट उसळली असून, या प्रकरणाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे आपल्या मतदारसंघातील गावांमध्ये नसलेल्या मुलभूत सुविधांचा अभाव असताना दुसरीकडे मात्र हे मंत्री जन आशिर्वाद यात्रा, संवाद यात्रेत व्यस्त आहेत.

Leave a Comment