Thursday, March 30, 2023

धक्कादायक! पाकिस्तानात २० डाॅक्टरांना कोरोनाची लागण

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रूग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही पाकिस्तानमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांना बळी पडत आहेत. आतापर्यंत सुमारे २० डॉक्टरांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. जिथे पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमधील एक डॉक्टर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याचा या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, पंजाबमधील ९ डॉक्टरांमध्ये कोरोना विषाणूची पुष्टी झाली आहे. त्यापैकी तीन जण गुजरातचे, दोन रावळपिंडी, दोन डेरा गाझी खान आणि दोन लाहोरचे आहेत.

तसेच पाकिस्तानमधील सिंध येथील ५ डॉक्टरांमध्येही कोरोना विषाणूची खात्री झाली आहे. याशिवाय बलुचिस्तानमधील ४ डॉक्टरांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला असून एका डॉक्टरचा तपासणी अहवाल येणे अजून बाकी आहे. तसेच, इस्लामाबादच्या पॉली क्लिनिक रुग्णालयात एका डॉक्टरला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाल्यानंतर २८ डॉक्टरांना क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी पुरविल्या जाणाऱ्या संरक्षणात्मक किटचा अभाव आणि डॉक्टरांना कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशा सुविधा नसल्याचा ठपका देशभरातील डॉक्टर ठेवत आहेत.

- Advertisement -

यासंदर्भात ‘उर्दू न्यूज’ शी बोलताना पिम्स रुग्णालयात कोरोना विषाणूसाठी स्थापित करण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डात ड्यूटीवर असलेले डॉ. फजल खान म्हणाले की, “डॉक्टरांना संरक्षणात्मक कपडे देण्यास विलंब झाला”. ते पुढे असेही म्हणतात की, ‘देशभरातील डॉक्टरांनी याचा निषेध म्हणून ओपीडी सेवा बंद केली होती आणि सरकारला संरक्षणात्मक कपडे देण्याची मागणी केली होती. पण सरकार गंभीर दिसत नाही. तो पर्यंत उशीर झाला आहे. यामुळेच मोठ्या संख्येने केसेस समोर येत आहेत. सरकारला हे समजले पाहिजे की जर कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती डॉक्टरांकडे आली तर संपूर्ण कर्मचार्‍यांना क्वारंटाइन ठेवणे आवश्यक आहे. यामुळे कर्मचार्‍यांच्या कमतरतेलाही सामोरे जावे लागू शकते. ‘डॉक्टरांना ७ हजार संरक्षणात्मक किट दिले आहे आणि अजूनही ५ हजार किट येणार आहे’

‘उर्दू न्यूज’ शी बोलताना लाहोरमधील मेयो रुग्णालयाचे डॉ. सलमान काझमी म्हणाले, ‘सर्व रुग्णालयांना सुरक्षा किट उपलब्ध होईपर्यंत या परिस्थितीवर मात करता येणार नाही. आयसोलेशन वॉर्डमधील काही डॉक्टरांकडे या किट्स आहेत. परंतु काही सामान्य सर्जिकल कपडे वापरत आहेत. त्याच वेळी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रवक्ते म्हणतात की संरक्षणात्मक किटचा पुरवठा चीनमधनं सुरू झाला आहे. देशभरातील सुमारे ७ हजार संरक्षणात्मक किट डॉक्टरांना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अध्यक्षांचे लेफ्टनंट जनरल मुहम्मद अफझल यांच्या म्हणण्यानुसार, चीनकडून आणखी ५००० संरक्षणात्मक किट उद्या पाकिस्तानला पोहोचतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३२१ वर, मुंबईत १६ तर पुण्यात २ नवे रुग्ण

खुशखबर! विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या आणखी कमी

कोरोनाने जगभरात ४० हजार जणांचा मृत्यू, ८ लाखांहून अधिक जण बाधित

निजामुद्दीन मरकजचे ‘महाराष्ट्र कनेक्शन’; आरोग्य यंत्रणेची झोप उडाली

‘या’ भारतीय महिलेने इटलीची केली पोल-खोल, केला खळबळजनक खुलासा