Saturday, March 25, 2023

बापरे ! तिखट मोमोज खाल्याने पोटामध्ये झाला स्फोट

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। चीन या प्रांतामध्ये अनेक ठिकाणी मोमोज आवडीने खाल्ले जातात. मोमोज चे वेगवेगळे प्रकार तेथील बाजरात उपलब्ध असतात. चीनमधील एक भयंकर प्रकार समोर आला आहे. कि एका व्यक्तीने मोमोज खाल्याने त्याच्या पोटामध्ये स्फोट झाला आहे. मोमोज मध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिरची मसाला होता. ते मोमोज खाल्यानंतर त्याच्या पोटात दुखायला लागले. पोटातून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायला सुरुवात झाली त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार या व्यक्तीला अगोदर पासूनच पोटाचे विकार होते. त्यानंतर मात्र डॉक्टरांनी त्यांना कोणतेही मसालेदार पदार्थ खाण्यास मनाई केली होती. तरीही ६५ वर्षीय असलेले वांझ यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता. त्यांनी तिखट आणि मसालेदार पदार्थ खाल्ले. त्यानंतर मात्र त्यांना लगेच त्रास जाणवायला सुरुवात झाली . त्याच्या आतड्यामध्ये स्फोट सारखे आवाज येत होते. या प्रकारानंतर डॉक्टर सुद्धा घाबरून गेले होते.

- Advertisement -

वांझ यांनी सांगितले कि, इच्छा झाली म्हणून काही मोमोज खाल्ले पण त्यानंतर झालेला त्रास असह्य होता. पोटातून वेगवेगळे आवाज निघत होते. तसेच स्फोट झाल्यासारखा भास पण होत होता. पोटात तीव्र अश्या वेदना होत होत्या डॉक्टरांनी चेक अप केल्यानंतर पोटातील अवस्था पाहून सर्वजण सर्वाना धक्काच बसला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in