आधी चिमुकल्याला गळफास..नंतर वडीलांनी स्वत:लाही संपवलं; पत्नीनं दरवाजा उघडला अन्..

फैजपूर : वृत्तसंस्था – शुक्रवारी दुपारी 12. 30 वाजण्याच्या सुमारास जळगावमधील फैजपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सहा वर्षीय मुलाला गळफास देऊन बापानेही गळफास घेवून आत्महत्या केली आहे. फैजपूर येथील बसस्थानकाच्या मागे असलेल्या आराधना कॉलनीमध्ये हि धक्कादायक घटना घडली आहे. निलेश घनश्याम बखाल असे वडिलांचे तर आर्यन बखाल असे मृत सहा वर्षीय मुलाचे नाव आहे. मात्र यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजूनही समजू शकले नाही.

मृत नीलेश बखाल हे पत्नी व सहा वर्षीय मुलगा आर्यनसह फैजपूर येथील आराधना कॉलनी याठिकाणी वास्तव्यास आहेत. घटनेच्या दिवशी नीलेश यांनी आपल्या पत्नीला दुपारी बाराच्या सुमारास किराणा आणण्यासाठी पत्नीला बाजारात सोडले आणि ते घरी परतले. घरी परतल्यानंतर निलेश यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला त्यानंतर मुलगा आर्यन याला गळफास दिला नंतर त्यांनी स्वतः सुद्धा गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला.

जेव्हा निलेश यांची पत्नी घरी परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. त्यांनी दरवाजा ठोठावला पण आतून प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यानंतर निलेश आणि आर्यन यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. यानंतर शेजारच्यांच्या मदतीने त्यांना खाली उतरवण्यात आले आणि तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यानंतर फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

You might also like