धक्कादायक ! मॉर्निग वॉकला गेलेल्या ४ जणांना अज्ञात वाहनाने चिरडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी – मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना अज्ञात वाहनानं चिरडल्याची धक्कादायक घटना परभणी जिल्ह्यात घडली आहे. यामधील दोन जणांचा मृत्यू झालाय. तर दोघांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचं बोललं जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळावर पोहचले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

परभणीमधील मानवत तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी सकाळी ही दुर्देवी घटना घडली. अज्ञात वाहनाने मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना चिरडलं. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चौघांना चिरडून वाहन चालक फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

मृतांमध्ये केकरजवळा गावच्या पोलीस पाटलांचाही समावेश आहे. पोलीस पाटील उत्तम लाडाने, आत्मराम लाडाने यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर नंदकिशोर लाडाने, राधेश्याम लाडाने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Comment