धक्कादायक! शेजाऱ्यांचा खून करून त्यांचे हृदय काढून, बटाट्यासोबत तळून कुटुंबाला खाऊ घातले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जगभरात अनेक चित्रविचित्र अपराध होत असतात. या भयावह अपरधाच्या वेळोवेळी मीडियामध्ये बातम्या येत राहतात. अश्या क्राइममुळे आपण कधी घाबरतो तर कधी- कधी आपलीच चिडचिड होते. कधी रागही येतो. अशीच एक घटना अमेरिकेमध्ये घडली आहे. लॉरेन्स अँडरसन नावाच्या एका इसमाने शेजारच्या दोन व्यक्तींना मारून त्यांचे हृदय काढले व घरच्यांना ते बटाट्यासोबत तळून खायला घातले.

अमेरिकेच्या ओक्लाहोमा या शहरात ही भयानक घटना घडली आहे. येथील लॉरेन्स अँडरसन नामक एका इसमाला शेजारच्या तीन लोकांवर भयानक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. ज्यांच्यावर लॉरेंसने हल्ला केला त्यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या बातमीनुसार लॉरेंसने शेजारच्या लिओन प्यें, त्यांची चार वर्षाच्या नात तसेच लिऑनच्या सूनेवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये नात आणि आजोबा मारले गेले. यानंतर आरोपीने हृदय काढून घेतले. आपल्या कुटुंबाला भुतापासून वाचवण्यासाठी अघोरी विद्या केली. ते हृदय त्याने बटाट्यासोबत तळून कुटुंबातील सदस्यांना खाऊ घातले. पोलिसांनी त्याला या गुन्ह्यामध्ये विविध कलमाखाली अटक केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like