गोव्यात धक्कादायक घटना, गोव्यातील रुग्णालयातील ऑक्सिजन टँकला गळती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून ऑक्सिजन गळती झाल्यानंतर ऑक्सिजन पुरवठ्या अभावी 24 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता गोव्यातही अशा प्रकारची धोकादायक घटना घडली असून गोव्यातील दक्षिण गोवा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती लागली आहे. ही गळती रोखण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत.

गोव्यात अचानक टँकरला लागलेल्या गळतीमुळे सर्वत्र लोकांची धावपळ उडाली. ऑक्सिजन टँक गळतीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तोपर्यंत ऑक्सिजनची गळती रोखण्याचे प्रयत्न सुरु होते. यादरम्यान रुग्णालय परिसरात पांढऱ्या धुराचं साम्राज्य पाहायला मिळालं.

नाशिकनंतर आता गोव्यात ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याची घटना घाली आहे. एकंदरीत पाहता टॅंकरमधील ऑक्सिजन गळतीच्या घटनेत वाढ होत असल्यामुळे या प्रकाराकडे राज्य सरकारकडून गांभीर्यपूर्वक लक्ष दिले जाईल का? असा प्रश्न सर्वसामान्यातून विचारला जात आहे.

Leave a Comment