धक्कादायक ! नवजात अर्भक फेकले नाल्यात; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

सांगली | शहरातील दक्षिण शिवाजीनगर परिसरात असणाऱ्या चांदणी चौक येथील अप्पा कासार झोपडपट्टी येथील एका नाल्यात चार महिन्यांचे पुरुष जातीचे अर्भक आढळले. परिसरातील नागरिकांनी मृत अर्भक नाल्यात पडल्याचे पहिले, त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.

घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस, महापौर आणि आयुक्त तातडीने दाखल झाले. पोलिसांनी अर्भकाला बाहेर काढून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेले. या प्रकरणी महादेव शिवाप्पा मांग यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. सोमवारी रात्री 11 ते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास या नाल्यात चार महिन्याचे अर्भक फेकुन दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही दुर्देवी घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. महादेव मांग यांनी हे अर्भक पहिले त्यानंतर एकच खळबळ उडाली.

अर्भक पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि बघ्यांची गर्दी झाली. नागरिकांनी याची माहिती तातडीने विश्रामबाग पोलिसांना दिली. दरम्यान, प्रसुतीपूर्व गर्भपात करून हे अर्भक मध्यरात्रीच्या सुमारास कोणाचेही लक्ष नसल्याचे पाहून नाल्यात टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like