धक्कादायक! अभिनेत्रीला गुंगीचे औषध देऊन करून घेतले पॉर्न शूट…

मुंबई | मुंबईच्या झगमगाटाच्या दुनियेमध्ये खूप जण आपले नशीब आजमावण्यासाठी रोज येत असतात. कुणाला अभिनेता व्हायचे असते तर कुणाला अभिनेत्री! बऱ्याच वेळा काही लोकांचे स्वप्न साकार होते. तर काही लोक फसवणुकीला बळी पडत असतात. असेच अभिनेत्री होण्याचे स्वप्न बाळगून झारखंडची एक तरुणी मुंबईमध्ये आली. मुंबईमध्ये आल्यानंतर ती पॉर्न प्रोडक्शनची शिकार ठरली आहे.

अभिनेत्री गहना वशिष्ठसोबत एका वेबसेरीजमध्ये काम करणारी तरुणी ही आता नवीन कामाच्या शोधात होती. कामाच्या शोधात आल्यानंतर ती पॉर्न फिल्म प्रोडक्शन ची शिकार ठरली. खोटे सांगून तिच्याकडून करारावर सह्या करून घेतल्या. ऐन वेळेला पॉर्न शूटिंग असल्याचे सांगितले. तिने पॉर्न फिल्म शूट करण्यास नकार दिल्यानंतर तिच्याकडे दहा लाख रुपयाची मागणी आणि नियमभंग केल्यामुळे पोलिसात देण्याची धमकी दिली. यानंतर एनर्जी द्रिंकमधून गुंगीचे औषध देऊन पॉर्न शूट करून घेतले.

28 जानेवारीला तिचे व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे तिला समजले. याप्रकरणी व्हिडिओ काढणाऱ्या यास्मिन खानला फोन करून विचारले असता त्याने, ‘हे काम आहे आणि ते आता प्रसारित होणारच’ म्हणून फोन कट केला. याप्रकरणी यास्मिन खान विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ‘पोलिस चांगले सहकार्य करत आहेत. माझ्यासोबत जे झाले ते अन्य मुलींसोबत होऊ नये यासाठी मी लढा देणार आहे ‘ असे पिडीत तरुणी माध्यमांशी बोलताना म्हणाली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

You might also like