उदगीर : जेवायला वांग्याची भाजी का देत नाही? जिवंत जाळून टाकतो, म्हणत रॉकेल ओतून पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. पत्नीस जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीविरुद्ध उदगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी शादुल नजीर शेख याचे लग्न झाल्या पासून सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. असे मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी परवाना शादुल शेख (वय 38) मला वांग्याची भाजी जेवायला का देत नाही, तुला मी बायको म्हणून का ठेवू, तुला मी जिवंत जाळतो असे म्हणत घरात बिस्लरीच्या बाटलीत ठेवलेले रॉकेल पत्नीच्या अंगावर टाकून चूलीजवळ ठेवलेली काडीपेटी घेऊन पेटवून पत्नीच्या अंगावर टाकली.
फरजाना शेख यांच्या साडीला व अंगाला भडका होऊन पेट घेतल्याने छाती, पोट, पाठ, गळा, दोन्ही हात, हनुवटी भाजुन गंभीर जखमी झालेली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पती विरूद्ध उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु.र न. 211/21 कलम 307, 498(अ), 504 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक नौशाद पठाण करत आहे.