धक्कादायक ! बायकोला रोज ड्रग्ज देत असे एक व्यक्ती, त्यानंतर अज्ञात लोकं येऊन करायचे बलात्कार; बनवत असे व्हिडीओ

पॅरिस । फ्रान्समध्ये एका 68 वर्षीय व्यक्तीला एका भयानक गुन्ह्यासाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ती व्यक्ती गेल्या दहा वर्षांपासून आपल्या पत्नीला माहिती न देता ड्रग्ज देत राहिला जेणेकरून अनोळखी व्यक्ती तिच्यावर बलात्कार करू शकतील. हे प्रकरण दक्षिण शहर एविग्नॉनचे आहे. येथे जवळपास एक वर्ष चाललेल्या चौकशीत एकूण 45 संशयितांची ओळख पटली. एका दुकानात महिलांच्या स्कर्टखाली कॅमेरा रेकॉर्ड केल्याच्या आरोपावरून सदर व्यक्ती पकडली गेली, ज्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघड झाले. आरोपींमध्ये 24 ते 71 वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे.

पोलीस आयुक्त जर्मी बोस प्लॅटिएर म्हणाले की,”या बलात्काराच्या प्रकरणात इतके पुरावे मिळणे अत्यंत दुर्मिळ आहे. आमच्याकडे ती घटना सिद्ध करण्यासाठी सर्व काही होते, तरीही या माणसाची पत्नी ड्रग्ज घेतल्यानंतर बेशुद्ध व्हायची आणि ज्यानंतर तिला बलात्काराबद्दल काहीही आठवत नसायचे.”

आपल्या पत्नीवरील बलात्काराचे अनेक क्लिप्सही त्या व्यक्तीकडे सापडल्या आहेत, जे तो गेल्या दशकापासून बनवत होता. अनेक लोकं वेगवेगळ्या क्लिप्समध्ये तिच्यावर बलात्कार करताना दिसतात. ती महिला आता 60 वर्षांची आहे आणि पोलिसांनी तिला सतर्क केल्यानंतरच संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. हे सर्व व्हिडिओ त्या व्यक्तीच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करण्यात आले होते. या व्यतिरिक्त, कॉम्प्युटरवरून अनेक कॅज्युअल सेक्स मीटिंग साइट्स देखील शोधण्यात आल्या, जिथे तिचा पती आपल्या पत्नीला ड्रग्ज देत असे आणि लोकांना तिचा फायदा घेण्यास सांगत असे.

पोलिस आयुक्तांनी सांगितले की,”तिचा पती या महिलेला नग्नावस्थेत बेडवर झोपवायचा. मग तो खोली गरम करायचा, जेणेकरून तिची झोप विस्कळीत होणार नाही. त्यानंतर अज्ञात लोकं तिच्यावर बलात्कार करायचे. जर पीडितेने थोडीशी जरी हालचाल केली तरी ते लगेच पळून जायचे. सध्या, ती व्यक्ती आणि आणखी 32 वर्षीय व्यक्तीला कोठडीत पाठवण्यात आले आहे आणि नऊहून अधिक लोकांची चौकशी सुरू आहे.