धक्कादायक! गरोदर पत्नीवर गोळी झाडून सैनिकाने स्वतः केली आत्महत्या 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय आर्मीच्या जवानाने आपल्या गरोदर पत्नीवर गोळी झाडून स्वतःही आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री वर्ध्यातील पुलगाव येथे ही  घटना घडली आहे. बुधवारी रात्री आपल्या ड्युटीवरून परत आल्यानंतर अजय कुमार सिंग यांचे पत्नी प्रियांका कुमारी यांच्यासोबत भांडण झाले. रागाच्या भरात अजय यांनी त्यांच्या सर्व्हिस गन मधून प्रियांका यांच्यावर गोळी झाडली त्या तात्काळ मृत्युमुखी पडल्या, त्यानंतर अजय यांनी स्वतःवर ट्रिगर रोखून गोळी झाडली ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकून लोक धावत या दांपत्याच्या घरी गेले तर समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला प्रियांका यांचा देह होता तर बाजूला जखमी अजय होते. त्यांना आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी गुरुवारी सकाळी प्राण सोडला. पुलगाव पोलीस स्टेशन मध्ये या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

अजय कुमार सिंग तसेच प्रियांका कुमारी हे दोघे २६ वर्षाचे होते तसेच बिहार चे होते. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे झाली होती. पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस इन्स्पेक्टर रविंद्र गायकवाड यांनी गेल्या ४-५ महिन्यांपासून त्यांच्यात वाद सुरु होते असे सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री दोघांमध्ये भांडण झाल्यावर अचानक डिवचल्यामुळे अजय कुमार यांनी गोळी झाडली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील तपास सुरु आहे असे ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment