भव्य मिरवणुकीने कोरेगावात श्रीराम नवमी उत्सव साजरा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

कोरेगाव येथील प्रभू श्री राम मंदिरास आज 100 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त तसेच श्रीराम नवमी निमित्त श्री राम सेना कोरेगाव यांच्या वतीने शहरातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.

कोरेगाव येथे श्रीराम मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरास तब्बल शंभर वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त श्री राम सेना कोरेगाव यांच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दरम्यान मंदिरास शंभर वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शहरातुन प्रभू श्रीराम, सीतामाई, हनुमान आदी देवदेवतांची वेशभूषा परिधान केलेल्या बालकांसह त्याची रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी भव्य रथासमोर ढोल, ताशा वाजविण्यात आले. यासह रथाची भव्य मिरवणूक हि शहरातून काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली होती.