कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड शहरातील नागरिकांची सण २०२०-२०२१ सालची घरफाळा व पाणीपट्टी सरसकट माफ करावी अशी मागणी करीत सुधारक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत घोडके यांच्यावतीने सोमवारपासून कराड पालिकेसमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे बंद पडलेल्या उदोग धंद्यामुळे व्यावसायिक, नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांची पालिकेने घरफळा, पाणीपट्टी रक्कम माफ करणे आवश्यक आहे. मात्र, पालिकेकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे आम्ही उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती अध्यक्ष श्रीकांत घोडके यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष घोडके म्हणाले कि, कराड शहरातील नागरिकांची सण २०२०-२०२१ सालची घरफाळा व पाणीपट्टी सरसकट माफ करावी, या मागणीचे निवेदन कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना देण्यात आले होते. तसेच शहरात काळे झेंडे लावून आंदोलनही केले होते. मात्र, त्याबाबत पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे या विरोधात आम्ही उपोषण करू असा इशाराही दिला होता. त्यानुसार आम्ही आजपासून नगरपालिकेच्या बाहेर लक्षणीय उपोषणास सुरुवात केली आहे.
आज कराड शहरात कोरोना, अतिवृष्टीमुळे तसेच सततच्या लॉकडाउनच्या नियमांमुळे व्यापारी, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही लोकांचे तर हातावरचे पोट आहे. त्यांना काम केल्यानंतर पैसे मिळतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांना काम नसल्याने घरखर्च भागवणे त्यांना अवघड होऊन बसले आहे. अशात कराड पालिकेची घरपट्टी, पाणीपट्टी कशी भरायची? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे पालिकेने त्यांची तत्काळ घरपट्टी व पाणी[पट्टी माफ करावी, जोपयांत पालिकेकडून आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा यावेळी घोडके यांनी दिला आहे.