व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा; श्रीकांत शिंदेनी डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पूर्वी काहीजण शो मॅन होते तसे काही जण आता दिसत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केल्यानंतर शिंदेंचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजितदादांवर हल्लाबोल केला आहे. दादा हा ‘शो’ नाही , पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे ,एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा असं म्हणत त्यांनी पहाटेच्या शपथविधी वरून अजित पवारांना डिवचले आहे.

श्रीकांत शिंदे यांनी आपल्या ट्विटर वरून अजित पवारांवर टीका केली. दादा हा ‘शो’ नाही , पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा… हा ‘शो’ले आहे ,एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा ! आणि हो …हिंदुत्वाचे तेज आणि विकासकामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली ? … पिक्चर अभी बाकी है’ !!! असा इशारा त्यांनी दिला.

अजित पवार नेमकं काय म्हणाले-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेक ठिकाणच्या गणपती मंडळांना भेट देत आहेत. अनेक नेत्यांच्या घरीही जात आहेत. मात्र, जाताना सोबत कॅमेरामन, फोटोग्राफर घेऊन जात आहेत. याच्यावरून अजित पवारांनी शिंदेंवर निशाणा साधला होता. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाही. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राजकुमार शो मॅन होते तसे काही शो मॅन आता झाले आहेत, अशा शब्दांत अजितदादांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता.