Big breaking | राष्ट्रवादीचं ठरलं, उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील लोकसभा लढणार

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आह. राष्ट्रवादीच्या एक बैठकीत सदर निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांकडून समजत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांच्या विरोधात श्रीनिवास पाटील लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.

श्रीनिवास पाटील दोन वेळा जुन्या कराड लोकसभा मतदारसंघातून खासदार होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून श्रीनिवास पाटील यांची ओळख आहे. पाटील यांच्या उमेदवारीमुळे उदयनराजेंसमोर मोठे आव्हान निर्माण झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीबरोबरच सातारा लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणुक लागणार आहे. ही निवडणुक रंगतदार होणार असल्याची सोशल मिडीयावर आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे.

सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने शरद पवार काय निर्णय घेताहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश न करता जिल्ह्यातील राजकीय वारे ओळखून राष्ट्रवादीमधून लढवली. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून नरेंद्र पाटील यांनी लढत दिली. या लढतीत 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीएवढे मताधिक्य उदयनराजेंना मिळाले नाही ते 1.26 लाखाच्या मताधिक्क्याने विजयी झाले. कमी मतांनी निवडून आल्याने त्यांनी अंगावर गुलालही घेतला नव्हता.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय असणारे श्रीनिवास पाटील हे कराड लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार झाले आहेत. तसेच ते सिक्कीमचे राज्यपालही होते. सातारा लोकसभा मतदार संघातील कराड, पाटण, कोरेगाव, जावली, सातारा तालुक्यात त्यांचा मोठा संपर्क असून मतदार संघावर चांगली पकड आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि विधानसभेच्या बातम्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.
WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाच्या बातम्या –

ब्रेकिंग| सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!

राष्ट्रवादीत मला काय मिळाळं ठेंगा; उदयनराजे भोसलेंचा सवाल

शिवेंद्रराजेंचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने केला हा मास्टर प्लॅन ; भाजपमधून केला जाणार उमेदवार आयात

EVM वर विश्वास नाही असं म्हणणार्‍या उदयनराजेंचा भाजपात प्रवेश

तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…

पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटेववर?

कराड दक्षिणसाठी पृथ्वीराजबाबा की उंडाळकरकाका? बाळासाहेब थोरातांनी दिले “हे” उत्तर

शरद पवारांचा आशीर्वाद घेऊन उदयनराजेंचा राष्ट्रवादीला रामराम

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

x Close

Like Us On Facebook