श्रीनिवास पाटील अन् उदयनराजे भोसले यांची दिल्लीत भेट; राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली | सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि राज्यसभा खासदार उसयनराजे भोसले यांची आज दिल्ली येथे भेट झाली. मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांत भाजपचे उदयनराजे यांचा राष्ट्रवादीच्या पाटील यांनी दारुन पराभव केला होता. आता या दोघांच्या भेटीने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे.

खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फेसबुल अकाऊंटवर उदयनराजे भोसले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट झाली. या भेटीत सातारा जिल्ह्याची विविध विकासकामे व प्रश्न संसदेत मांडून पाठपुरावा करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

https://www.facebook.com/353804234638468/posts/4082477258437795/

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील दोन खासदार स्थानिक प्रश्नांसाठी एकत्र आल्यास जिल्ह्याच्या विकासाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. एक अभ्यासू नेतृत्व तर दुसरे सत्ताधारी पक्षाचे खासदार यामुळे दोघांनी जिल्ह्याच्या विकासासंदर्भातील प्रशंन संसदेत माडून पाठपूरावा केल्यास ते जिल्ह्यासाठी परिणामकारक ठरणार आहे.

You might also like