Wednesday, June 7, 2023

पोलिस दलात निरीक्षकांचे खांदेपालट; आठ सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदल्या

औरंगाबाद | मागील महिन्यात शहरपोलीस दलात बदल्या करण्यात आल्या होत्या. 560 कर्मचाऱ्यांना नवीन पोलीसठाणे मिळाले होते. त्याचबरोबर उर्वरित कर्मचाऱ्यांचे आदेश निघणार होते. आता ग्रामीण पोलीस दलामध्ये मोठ्या फेरबदला करण्यात आल्या आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक, कार्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि सात पोलीस उपनिरीक्षकांची पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.

एपीआय जगदीश पवार आणि बाबा भीलू राठोड यांची बदली उच्च न्यायालय पैरवी या ठिकाणी झाली. देविदास बाळासाहेब वाघमोडे, सचिन विश्वनाथ खटके आणि दिनेश उत्तम जाधव यांची बदली कन्नड शहर पोलीस स्टेशन, जनाबाई आश्रुबा सांगळे यांची पैठण, राम सुखदेव घाडगे आणि सचिन नाना पाटील यांची वैजापूर, पीएसआय अरविंद भारत गटकुल पैठण ग्रामीण पोलीस स्टेशन, सुशांत शिवाजीराव सुताळे पाचोड, दिलीप राधाकिसन चौरे पैठण ग्रामीण, देविदास बाबूअप्पा खांडकुळे देवगाव रंगारी, जनार्दन बाबुराव मुरमे आणि मधुकर रंगनाथ मोरे खुलदाबाद आणि बबन नारायण धनवट जिल्हा विशेष शाखा यांच्या विविध ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहे.