डेळेवाडीत उपसरंपच शुभांगी बाबर यांच्याकडे सरपंच पदाचा पदभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | डेळेवाडी (ता. कराड) येथील ग्रामपंचायत निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत हनुमान, मथुरदास भैरवनाथ विकास पॅनेलच्या शुभांगी विजय बाबर या भरघोस मतांनी निवडून आल्या होत्या. त्यांची नुकतीच उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. परंतु डेळेवाडी गावचे सरपंच पद रिक्त असल्याने शुभांगी बाबर याच सरपंच पदाचा पदभार सांभाळणार आहेत.

माजी सरपंच तात्यासाहेब बाबर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक झाली. त्याचबरोबर त्यांच्या पॅनेलचे चार सदस्य निवडून आले आहेत. उपसरपंच निवडीत शुभांगी बाबर यांच्या बिनविरोध निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी विकास स्वामी, ग्रामसेवक व्ही. एम. मोहिते यांनी काम पाहिले. या वेळी नूतन उपसरपंच यांचा सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला.

तात्यासाहेब बाबर, काशिनाथ बाबर, महादेव बाबर, पांडुरंग बाबर, संतोष बाबर, संपत बाबर, पंढरीनाथ बाबर, प्रताप बाबर, प्रकाश बाबर, दादासाहेब बाबर, वसंत बाबर आदी उपस्थित होते. उपसरपंच शुंभागी बाबर यांचे राष्ट्रवादीचे युवानेते सत्यजित पाटणकर, खा. श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आ. बाळासाहेब पाटील यांनी अभिनंदन केले.