#Shweta_Your_Mic_Is_On: प्लिज श्वेता माईक बंद कर! ‘झूम’ क्लासमध्ये नको ते नकळत बोलून गेली आणि…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडियावर सध्या एका झूम क्लासची ऑडिओ क्लीप चांगलीच व्हायरल झाली आहे. यामध्ये एक श्वेता नावाची तरुणी आपल्या सेक्स-अ‍ॅडिक्ट मित्राविषयी तिच्या मैत्रीणीला सांगत आहे. झूम क्लास सुरु असताना माईकऐवजी तिने स्पीकर ऑफ केला असावा आणि तिच्या आणि तिचे गॉसिपिंग सुरु झालं.

श्वेताच्या गप्पा सुरु झाल्यानंतर सुरुवातीला झूम क्लासमधील मित्रांना हसू आवरेना. ‘त्या मुलाने मला फोन करुन सांगितलं की तो आपल्या गर्लफ्रेण्डबद्दल खूप पझेसिव्ह आहे. म्हणजे त्याला मला सुचवायचं होतं. ’ असं म्हणत तिने एका तरुणाची स्टोरी सांगायला सुरुवात केली. त्यानंतर पहिली हाक आली.. ‘श्वेता… ’ त्यानंतर श्वेताच्या नावाने क्लासमधील मुलांनी तिला थांबवण्यासाठी दवंडी पिटणे सुरु केलं.. श्वेता तुझा माईक ऑन आहे, श्वेता माईक बंद कर… प्लिझ…पण आपला माईक सुरु असून पूर्ण क्लास आपलं गॉसिप ऐकत आहे याचा श्वेता नावाच्या तरुणीच्या ध्यानीमनीही नव्हते.

आणि श्वेताचे सुसाट गॉसिपिंग..
गॉसिप करण्यात रमलेल्या श्वेताचं ना झूम क्लासकडे लक्ष होतं, ना मित्रांच्या हाका-आरोळ्यांकडे. ‘तो मला सांगत होता, की ती मुलगी मला फक्त वापरत होती. मला हे माहितही नव्हतं. मी तिच्या मागे वेडा झालो होतो. पण ती सेक्स अ‍ॅडिक्ट होती. तिच्याबद्दल आकर्षण होतं. कसं सांगू मी तुला… तिने मला अशी सवय लावली, की आम्ही प्रत्येक भेटीत करायचो. राधिका, कोणी मुलगा आपली गुपितं अशी मित्रांना सांगत नाही. पण त्याने एक-एक सिक्रेट सांगितलं. त्याने आपल्या स्वतःच्या बेस्ट फ्रेण्डला या गोष्टी सांगितल्या नाहीत, त्या मला सांगितल्या.’ असं श्वेता राधिकाला सांगताना ऐकायला मिळतं. त्यावर एका तरुणाची कमेंट म्हणजे काळजी करु नकोस, आता १११ जणांना हे कळलंय. सध्या तमाम नेटिझन्स ही ओडियो क्लीप चवीने चघळत आहेत. त्यामुळे #shwetayourmicison (श्वेता युअर माईक इज ऑन) हा हॅशटॅग सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेण्डिंगमध्ये आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.