कराड तालुक्यातील विंग परिसरात बिबट्याचे दर्शन ; ग्रामस्थांच्यात घबराट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

एकीकडे कोरोनामुळे ग्रामीण भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे, अशा परस्थिती कराड तालुक्यातील विंग गावाच्या परिसरात बिबट्याचा शिरकाव झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मंगळवारी विंग येथील कानिफनाथ मंदिर परिसरात ग्रामस्थांना बिबट्या आढळून आला. त्याने या परिसरातील एका शेळीच्या लकपातील कोकरावरही हल्ला केला आहे. बिबट्या आढळला तेव्हा त्याचे चित्र काही ग्रामस्थांनी आपल्या मोबाइलमध्येही घेतले आहे. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये सध्या खबराटीचे वातारण निर्माण झाले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कराड तालुक्यातील विंग गाव परिसरात बिबट्याचा वावर आहे. मुक्तपणे माळरान परिसरात फिरणाऱ्या बिबट्याने अनेक पाळीव जनावरांवर हल्लाही केला आहे. तसेच आपली दहशत पसरवली आहे. या बिबट्याचा वावर हा मसोबा माळ, सुतारकी वस्ती, कणसे मळा अशा विंग परीसरातील भागात आहे. मंगळवारी हा बिबट्या विंग परिसरातील कानिफनाथ मंदिर येथील एका शेतकडेला असलेल्या हंबीरराव शिंदे व त्यांच्या कुटुंबियांच्या निदर्शनास आला. त्यावेळी त्या कुटुंबातील काही सदस्यांनी त्याला कॅमेराबद्द केले.

विंग परिसरात बिबट्याने आपली दहशत माजविली असल्याने या परिसरातील गग्रामस्थांनी सायंकाळनंतर घराबाहेर पडण्याचे टाळले आहे. मुक्तपणे वावर करीत असलेल्या बिबट्याने काल सायंकाळच्या सुमारास सुतारकी नावाच्या परिसरात असलेल्या कैलास खबाले यांच्या मालकीच्या असलेल्या शेळीच्या कळपातील एका कोकरावरही हल्ला केला. त्यावेळी त्या परिसरात असलेल्या काही लोकांनी त्या बिबट्याला हटवून लावले. काही दिवसांपूर्वी या परिसरात या शैलीच्या कल्पनांवर बिबट्याच्या जोडीने हल्ला केल्याची घटना घडली होती.