भारतात गुगल प्ले स्टोअरवर नंबर-1 फ्री अ‍ॅप ठरला ‘Signal’, Whatsapp च्या या सर्वात मोठ्या पर्यायाविषयी संपूर्ण माहिती वाचा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून अंमलात येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन पॉलिसीमुळे अनेक युझर्स नाखूष आहेत, यामुळे युझर्स व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय शोधू लागले आहे. आता लोकं प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल (Signal) वर स्विच करत आहेत. आता हे अ‍ॅप भारतासह अनेक देशांमध्ये टॉप फ्री अ‍ॅप बनला आहे.

https://twitter.com/elonmusk/status/1347165127036977153?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347165127036977153%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.news18.com%2Fnews%2Ftech%2Fsignal-becomes-no1-free-app-on-google-store-in-india-beats-whatsapp-know-everything-nodvkj-3409668.html

एलन मस्क यांनी केले ट्विट
टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांनी ट्विट करुन आपल्या फॉलोअर्सना सिग्नल अ‍ॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. मस्कच्या या ट्विटने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या ट्विटला 2.7 लाखाहून अधिक लोकांनी लाईक्स केले असून 32 हजारांहून अधिक जणांनी रीट्वीट केले आहे.

2014 मध्ये सिग्नल अ‍ॅप लाँच केले गेले
फेसबुकला विकल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप चे सह-संस्थापक ब्रायन अ‍ॅक्टॉनने सिग्नल फाऊंडेशनची स्थापना केली. सिग्नल अ‍ॅप सिग्नल फाऊंडेशन आणि सिग्नल मेसेंजर एलएलसीच्या मालकीचे आहे. हे 2014 मध्ये लाँच केले गेले. सध्या सिग्नल अ‍ॅप चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोक्सी मार्लिनस्पाइक (Moxie Marlinspike) हे आहेत. या अ‍ॅपची टॅगलाइन आहे ‘Say Hello to Privacy’.

सिग्नल आणि व्हॉट्सअ‍ॅपमध्ये काय फरक आहे
व्हॉट्सअ‍ॅपने आता युझर्सचा डेटा एकत्र करण्यास सुरवात केली आहे तर सिग्नल अ‍ॅप कोणत्याही प्रकारे युझर्सचा डेटा संकलित करत नाही. सिग्नल अ‍ॅप हे केवळ युझर्सचा मोबाइल नंबर घेते, तर व्हॉट्सअ‍ॅप सर्व डेटा, फोन नंबर, कॉन्टॅक्ट लिस्ट, लोकेशन, मेसेज हा डाटा कलेक्ट एकत्रित करतो.

व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी काय आहे ?
व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन पॉलिसी आणली आहे, ती 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत युझर्सना स्वीकारावी लागेल. यासाठी आपण व्हॉट्सअ‍ॅपच्या हेल्प सेंटर मध्ये जाऊन पॉलिसीमध्ये अ‍ॅग्री आणि नॉट नाऊ हा पर्याय निवडू शकता. ज्यामध्ये असे लिहिले आहे की, आमच्या सर्व्हिसेस ऑपरेट करण्यासाठी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपचा कंटेंट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला जाईल. युझर्सकडे नवीन पॉलिसीचे एक पॉपअप असेल, जे त्यांना स्वीकारावे लागेल. यासाठी आपण अ‍ॅग्री वर टॅप केल्यास आपण कंपनीच्या नवीन पॉलिसीला आपली सहमती द्याल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment