कोरोना लसीच्या किंमतीवरून उडालेल्या गोंधळात SII ने कमी केली Covishield लसीचे दर, आता किती पैसे मोजावे लागतील हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोविड -19 या लसीची किंमतीवरून खूपच गोंधळ माजला आहे. दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) बुधवारी कोविशिल्ड (Covishield) लसीच्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या ‘कोविशिल्ड’ या राज्य सरकारांसाठी प्रती डोसची किंमत 400 रुपये निश्चित केली होती. आता ते प्रति डोस 300 रुपयांवर आणण्यात आले आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पूनावाला यांनी ट्विट केले की, “मी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून देण्यात येणाऱ्या लसीची किंमत प्रति डोस 400 रुपयांवरून 300 रुपयांपर्यंत कमी करत आहे आणि ती तत्काळ अंमलात येऊ शकेल.” यामुळे राज्यांची हजारो कोटी रुपयांची बचत होईल. यामुळे जास्तीत जास्त लसीकरण आणि असंख्य जीव वाचविण्यास मदत होईल. ”

तथापि, SII ने कोविशिल्डच्या एका डोसची किंमत केवळ राज्य सरकारांसाठी कमी केली आहे. खासगी रुग्णालयांना अद्याप कोविशिल्ड लसीचा डोस हा 600 रुपयांमध्येच मिळेल.

केंद्राने सीरम आणि भारत बायोटेकला किंमत कमी करण्याचे केले आवाहन
येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोरोना लसीच्या किंमतींवरून माजलेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांना त्यांच्या लसीची किंमत कमी करण्यास सांगितले होते. पीटीआयने सरकारी सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, सरकारने दोन्ही कंपन्यांना किंमत कमी करण्यास सांगितले आहे. लसीच्या किंमतीवरून अनेक राज्य सरकारे आणि विरोधी पक्ष केंद्र सरकारला लक्ष्य करीत आहेत.

 

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment