Sunday, June 4, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताचा प्रजासत्ताक दिन आता काही दिवसांवर आला आहे. या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकी देण्यात आली आहे. 26 जानेवारी 2022 म्हणजेच प्रजासत्ताक दिवस आणि पंजाब विधानसभा निवडणुकी आधी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने धमकी दिली असून 26 जानेवारीला नरेंद्र मोदींना रोखणार असल्याचे खलिस्तानी समर्थकाने म्हटले आहे.

26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात येणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधानांना धमकी देण्याचा प्रकार सिख फॉर जस्टिस यांच्याकडून करण्यात आला आहे. याबाबतचा एक व्हिडीओ एसएफजे प्रमुख गुरुपतवंत सिंह पन्नू यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ अजय शेरावत यांनी ट्वीटरवर पोस्ट केला आहे.

या व्हिडिओत 26 जानेवारी रोजी राजधानी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्लॉक करा अन् तिरंग्याऐवजी खलिस्थानी झेंडा फडकवा. तसेच पंतप्रधान मोदी यांचा ताफाही इंडिया गेटवर जाण्यापासून रोखणार आहे. दरम्यान ‘सिख फॉर जस्टिस’ने वकिलांनाही धमकी दिली असून काही वकिलाची यादी तयार करणार असल्याचे म्हंटले आहे.

‘सिख फॉर जस्टिस’ने भारतातील लोकांना भडकावण्यासाठी 2,50,000 अमेरिकन डॉलरचे बक्षीस घोषीत केले होते. दि. 5 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेची त्रृटी यांच्यामुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान दि. 3 जानेवारी रोजी सिख फॉर जस्टिस यांनी एक व्हिडीओ जारी करत पंजाबमधील शेतकऱ्यांना भडकावले होते.