स्तुत्यस्पद । आता ‘हि’ नगरपरिषद करणार रेमडेसीवीरचा सर्व खर्च

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | जिल्ह्यात शहरातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढ होत आहे. या कळत कोरोना रुग्णांना रेमडेसीवर इंजेकशनची आवश्यकता आहे. त्यासाठी बाजारात भरपूर पैसा मोजावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन सिल्लोड नगरपरिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. रेमडेसीवीरचा सर्व खर्च नगरपरिषदेच्या माध्यमातून होणार असल्याचा निर्णय सिल्लोड नगरपरिषदेने घेतला आहे.

या मागणीसाठी उपविभागीय अधिकारी यांना युवा नेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी पत्र देखील लिहिले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करीत असताना खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सिल्लोड नगरपरिषदेने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

कोरणा बाधित गंभीर रुग्णांना आवश्यक असल्यास त्वरित रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावे यासाठी नगरपरिषद स्वतःचा खर्च उचलणार असून. यामुळे करुणा रुग्णांवर वेळेत उपचार होईल. परिणामी करूनच या मृत्यू दरातही कपात होईल. याबाबत महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नगरपरिषदेत सूचना दिल्या असता उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी उपविभागीय अधिकारी यांना याबाबत पत्र दिले आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सिल्लोड नगरपरिषद देशात सर्व पुढे असते. कोरोनाच्या काळात राज्यत सर्वाधिक उपाययोजना करणारी नगरपरिषद म्हणून सिल्लोड नगरपरिषडेकडे पहिल्या जाते.

Leave a Comment