Income Tax वाचवण्यासाठीचे काही सोपे उपाय जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Income Tax : जेव्हा तुम्ही टॅक्स भरण्यास पात्र ठरता तेव्हा सुरुवातीच्या काळात तुमच्यासमोर अनेक गुंतागुंत असते. इन्कम टॅक्स म्हणून कमाईचा भाग भरणे सुरुवातीला जड वाटते. मात्र देशाच्या विकासासाठी एक जबाबदार नागरिक म्हणून टॅक्स भरणे हे आपले कर्तव्य आहे. लोकं नेहमी जास्तीतजास्त टॅक्स बचत करण्याचे ऑप्शनच्या शोधत असतात. टॅक्स म्हणून भरावे लागणारे पैसे वाचवू शकणारे पर्याय गमावणे कोणालाही आवडणार नाही. अनेक लोकं यासाठी वेगवेगळे मार्ग वापरतात.

Finish these 5 things before Income Tax rules change on April 1

नागरिकांमध्ये जास्त टॅक्स वाचवण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने कलम 80C अंतर्गत काही महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या अंतर्गत, तुम्ही विविध इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये पैसे गुंतवून टॅक्स सूट मिळवू शकता. Income Tax

तुम्ही खालील इन्व्हेस्टमेंट ऑप्शनमध्ये गुंतवणूक करून पैसे वाचवू शकता-

● Pension plans

● PPF accounts

● Equity mutual funds

● 5-year tax-saving deposits

● Life insurance policies or term plans

Income Tax dept notifies form for filing updated I-T returns - BusinessToday

पगार भत्ता

तुमचे कर दायित्व कमी करण्यासाठी बहुतेक कंपन्या तुमच्या पगारामध्येच अनेक तरतुदी करतात. या संदर्भात तुम्ही तुमच्या कंपनीच्या HR शी देखील बोलू शकता. तुम्ही तुमच्या पगाराचा एक भाग म्हणून वैद्यकीय भत्ता, वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता आणि टेलिफोन खर्च यासारखे भत्ते घेऊ शकता, कारण ते करपात्र नाहीत. Income Tax

How to Save Income Tax in India - Living the IIT dream

घरभाडे भत्ता (HRA)

कर्मचार्‍यांना त्यांच्या उत्पन्नात सामान्यतः घरभाडे भत्ता (HRA) मिळतो. जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि नियोक्त्याकडून भाडे भत्ता मिळत असेल, तर तुम्ही, एक कर्मचारी म्हणून, आयकर कायद्यानुसार HRA वर सूट मिळण्याचा क्लेम करू शकता. Income Tax

ITR filing: This income tax return violation may land you in jail. Details  here | Mint

धर्मादाय योगदान

तसेच, कलम 80G अंतर्गत धर्मादाय योगदान तुमच्या उत्पन्नाच्या 10% पर्यंत वजा केले जाते. मात्र, तुम्ही पावतीशिवाय देणगी देण्याऐवजी संस्थेकडून पावती आणि त्यांच्या आयकर सूट प्रमाणपत्राची कॉपी मिळाल्याची खात्री करा. Income Tax

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.incometax.gov.in/iec/foportal

हे पण वाचा :

पोस्ट ऑफिसद्वारे Passport साठी कसा अर्ज करावा ते समजून घ्या

Jio च्या ‘या’ प्लॅनमध्ये फक्त 20 रुपये भरून मिळवा अतिरिक्त 56 दिवसांची व्हॅलिडिटी !!!

Business Idea : कमी गुंतवणुकीद्वारे ‘या’ व्यवसायातून मिळवा हजारो रुपये !!!

जबरदस्त लूक अन् वेगाने चार्जिंग होणाऱ्या जगातील टॉप 5 Electric Cars !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा

Leave a Comment