मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारच्या मनात पाप : विनायक मेटेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणबाबत केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडी वर भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हल्लाबोल केला. त्यांच्यानंतर आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्याकडून आज जोरदार टीका करण्यात आली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना मेटे यांनी म्हंटल आहे कि, “आघाडी सरकारच्या मनात पाप आहे. मराठा आरक्षणाबाबत हे सरकार खोटं बोलत आहे.,” अशी घणाघाती टीका मेटे यांनी केली.

मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारवर आज शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी टीकास्त्र सोडले. “राज्य सरकारने आरक्षणासाठी कायदेशीर प्रयत्न करायचे सोडून हे सरकार तोंडाला कुलूप लावून बसले आहे. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही तसेच लवकरच राज्य सरकारच्या विरोधात ४ ते ५ जूनला मोर्चाही काढणार असल्याचा इशारा मेटे यांनी दिला.

यावेळी विनायक मेटे मराठा आरक्षणाबाबत १०२ घटनादुरुस्थिबाबत केंद्र सरकारने जी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. त्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानायला हवे. मात्र, काहींकडून या घटना दुरुस्तीबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात आहे, अशी मेटे यांनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण लवकरच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार आहोत तसेच त्यांना निवेदनही देणार असून राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारमधी नेत्यांना जाब विचारावा अशी मागणीही किनार आहोत, अशी माहिती मेटेंनी यावेळी दिली. तसेच लवकरच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन राष्ट्रपती राजनाथ कोविंद यांचीही भेट घेणार असल्याचीही मेटे यांनी सांगितलं.

Leave a Comment