Saturday, February 4, 2023

‘बेबी डॉल’फेम गायिका कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह; ३०० लोकांच्या पार्टीत झाली होती सहभागी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘बेबी डॉल मैं सोने दी’ आणि ‘चिटियां कलाईयां’ हे सुपरहिट गाणे गाणारी गायिका कनिका कपूरला करोनाची लागण झाली आहे. कनिका कपूर नुकतीच लंडनहून परतली होती. आपली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची बाब तिने लपवून ठेवली होती. दरम्यान, कनिका करोनाची लागण झालेली भारतातील पहिली सेलेब्रिटी ठरली आहे.

पुढे आलेल्या वृत्तानुसार, गायिका कनिका कपूर १५ मार्च रोजी लंडनहून लखनऊला आली होती. त्यानंतर लखनऊमध्ये एका हाय प्रोफाइल पार्टीमध्ये तिने हजेरी लावली होती. अनेक बड्या नेते आणि न्यायाधीशांसह सुमारे ३०० लोक या पार्टीत उपस्थित होते. मात्र, केवळ कनिका कपूरच कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर या पार्टीत सहभागी झालेली प्रत्येक व्यक्तीमध्ये आता भीती निर्माण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान, कनिकाने स्वतः आपल्या सोशल मीडियावरून कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह असल्याची कबुली दिली आहे. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना लिहिले की, ‘गेल्या ४ दिवसांपासून मला फ्लूची लक्षणे दिसत होती. चाचणी केल्यानंतर मला करोनाची लागण झाल्याचे मला कळले असून मी आणि माझे कुटुंब आता पूर्णपणे एकांतात आहोत. पुढे काय करावे याबद्दल आम्ही संपूर्ण वैद्यकीय सल्ला घेत आहोत.”

कनिकाने पुढे लिहिले आहे की, ‘या दरम्यान मी ज्यांना भेटले त्यांच्या तपासणीचे कामही सुरू झाले आहे. मी दहा दिवसांपूर्वी घरी आले होते तेव्हा विमानतळावर नेहमीच्या पद्धतीने माझी चाचणी घेण्यात आली. पण मला ४ दिवसांपूर्वीच लक्षणे जाणवू लागली. या टप्प्यावर, मी फक्त तुम्हाला इतके सांगेल आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्यावी आणि गर्दीपासून दूर रहा. लक्षणे दिसल्यास स्वत: ची चाचणी घ्या. मी आता ठीक आहे आणि फ्लूसारखी सामान्य लक्षणे आणि थोडासा ताप आहे. यावेळी आपण सर्वांनी जबाबदार नागरिकाची भूमिका निभावली पाहिजे.”

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.