Wednesday, June 7, 2023

बहीण, वडील कॉंग्रेसमध्ये तर पत्नी भाजपमध्ये गेल्याने रविंद्र जडेजाने दिला ‘ या ‘ पक्षाला पाठिंबा

मुंबई प्रतिनिधी |वडील आणि बहीणने कॉंग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला आपली भूमिका स्पष्ट करणे भाग होते. कारण या आधी मार्च महिन्यामध्ये जडेजाची पत्नी रीवावा रविंद्र  जडेजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे रविंद्र जडेजाने आपली भूमिका  ट्विट करून स्पष्ट केली आहे.

रविंद्र जडेजा  याने  ट्विटर वरून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दर्शवला  आहे. मी नरेंद्र मोदी आणि रीवावा जडेजा यांना पाठिंबा देतो  आहे असे  म्हणून त्याने या मजकुराच्या पुढे जय हिंद असे लिहले आहे. रविंद्र जडेजा यांनी आपला पाठिंबा भाजपला दर्शवून माध्यमात चालणाऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

 रविंद्र जडेजा यांची मोठी बहीण नयनाबा जडेजा आणि वडील अनिरुद्ध सिंह यांनी रविवारी गुजरात मधील जामनगर येथे कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. महिला सबलीकरणासाठी मला काम करायचे असल्याने मी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करत आहे असे नयनाबा जडेजा यांनी म्हणले आहे.