धक्कादायक ! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची हत्या, २ जणांना अटक

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – मंगळवारी रात्री नागपूरमधील पाचपावली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्षुल्लक कारणावरून सहा जणांनी धारधार शस्त्रांनी रूपेश कुंभारे या २२ वर्षीय तरुणाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत २ जणांना अटक देखील केली आहे. तर ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रवीण ऊर्फ गोलू वाघमारे आणि गौरव गिरडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

काय आहे नेमकं प्रकरण
रूपेश केशकर्तनालयात काम करत होता. मंगळवारी रात्री रूपेश हा वेगाने मोटारसायकल चालवत होता. तेव्हा रुपेशला गोलू व गौरवने हटकले. त्यानंतर रूपेश आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा रुपेशने त्या दोघांनाही ठार मारण्याची धमकी दिली. त्याच रात्री १० वाजता गोलू, गौरव आणि त्यांच्या काही साथीदारांनी रूपेशला गाठून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करून त्याची केली. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले.

या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून २ जणांना अटक केली आहे. तर ३ जणांना ताब्यात घेतले आहे. या अगोदर २ दिवसांपूर्वी पिंकी शर्मा या तरुणीची हत्या करण्यात आली होती. या २ हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरले आहे.

You might also like