Saturday, March 25, 2023

आज सोन्याच्या दरात किंचित घसरण, जाणून घ्या आजचे दर 

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  सोनेबाजारात आज सोनेदरात किंचित घट झाल्याची दिसून आली. तर चांदीच्या दरात ही घट दिसून आली. आज २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४७,२५०रु तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम  ४८,२५० इतका नोंदवला गेला. तर चांदीचा दर प्रति १ किलोग्रॅम ४७,७००रु इतका नोंदविला गेला आहे. गुरुवारी हा दर २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅम ४७,४१०रु तर २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८,४१० इतका होता. तर चांदीचा दर गुरुवारी प्रति १ किलोग्रॅम ४८,४६०रु इतका होता.

२२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम १६ रु तर २४ कॅरेट सोन्याच्या दरातही प्रति ग्रॅम १६रु घसरण दिसून आली आहे. चांदीच्या दरात प्रति १ किलोग्रॅम ७६० रुपयांची घसरण दिसून आली आहे. दरम्यान बेंगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई येथे २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम अनुक्रमे  ४५,२५०रु, ४६१८०रु, ४६७००रु, ४७२५०रु इतका नोंदविला गेला आहे.

- Advertisement -

तरबेंगलोर, चेन्नई, दिल्ली, मुंबई येथे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम अनुक्रमे ४९४००रु, ५०३९०रु, ४७९००रु, ४८२५०रु इतका नोंदविला गेला आहे. या शहरांमध्ये चांदीचा दर हा सारखाच प्रति १ किलोग्रॅम ४७,७००रु इतका नोंदविला गेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.