व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता छोट्या व्यावसायिकांना फक्त 30 मिनिटांत मिळणार 50 लाखांपर्यंतचे कर्ज, कसे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । देशातील छोट्या व्यावसायिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता त्यांना 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज त्वरित मिळणार आहे. फेडरल बँकेने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) ऑनलाइन कर्ज सुविधा देण्यासाठी एक प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

फेडरल बँकेने दावा केला आहे की, federalinstaloans.com वर छोट्या व्यावसायिकांना 30 मिनिटांत 50 लाख रुपयांचे कर्ज मिळेल. बँकेचे म्हणणे आहे की, त्यांचे प्लॅटफॉर्म अल्गोरिदम वापरून कर्ज घेण्यासाठी व्यावसायिकाने अपलोड केलेली कागदपत्रे पटकन कॅप्चर करते. यामुळे वेळेची बचत तर होतेच त्याबरोबरच कर्ज देण्यासाठी वेळ देखी; कमी लागतो.

ऑनलाइन अर्जात कमी एंट्री
कर्जासाठी अर्ज करण्यासाठी ग्राहकाला बँकेच्या शाखेत जावे लागणार नाही, असे फेडरल बँकेचे म्हणणे आहे. तो कर्जासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतो. अर्जदाराने ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ITR, बँक अकाउंट स्टेटमेंट आणि GST डिटेल्स अपलोड करणे आवश्यक आहे. कर्जासाठीच्या अर्जातही फारच कमी माहिती द्यावी लागेल. याचे कारण असे की, अपलोड केलेल्या कागदपत्रांमधून बहुतेक डिटेल्स ऑटोमॅटिकपणे भरले जातील जसे की GST, ITR आणि बँक खाते डिटेल्स. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. कर्जदाराला कागदपत्रे पूर्ण करण्यासाठी बँकेच्या शाखेत जावे लागेल.

फेडरल बँकेची उपकंपनी IPO लाँच करण्याच्या तयारीत आहे
फेडरल बँकेच्या बोर्डाने तिच्या उपकंपनी Fedbank Financial Services (FedFina) च्या IPO प्रक्रियेस मान्यता दिली आहे. Fedfina ही रिटेल नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. IPO चा साईज, विक्रीच्या ऑफरचा भाग, किंमत आणि Fedfina ने प्रस्तावित केलेल्या IPO संदर्भात इतर डिटेल्स योग्य वेळी निश्चित केले जातील.