कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
एसएमबीटी सेवाभावी संस्थेने आरोग्य सेवा आणि शिक्षण देतांना जी अत्याधुनिक गुणवत्ता राखली आहे, ती भारावून टाकणारी आहे. समाजकल्याणाचा हेतू ठेऊन काम करतांना येथून तयार होणारे डॉक्टर्स समाजाची खरी संपत्ती ठरतील असे प्रतिपादन नाशिक पोलिस परिक्षेत्राचे अधिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.
एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या वार्षिक उत्सवात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे, संचालक ब्रिगेडियर डॉ. वसंत पवार, मुख्याधिकारी श्रीराम कु-हे, दशरथ वर्पे, एसएमबीटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद चितळे, एसएमबीटी डेंटल संगमनेरचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील, एसएमबीटी डेंटल कॉलेज नाशिकचे प्राचार्य डॉ. किरण जगताप, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रदीप भाबड, फार्मसी कॉलेजचे डॉ. अविनाश ढाके आणि डॉ. योगेश उशीर आणि सर्वच प्रमुख डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.