पंतप्रधानांच्या सभेत स्फोट, Smoke Bomb ने हल्ला; कुठे घडली घटना?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावरून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. फुमियो हे एका सभेला संबोधित करत असतानाच हल्लेखोराने त्यांच्यावर स्मोक बॉम्बने हल्ला केला. यावेळी भीषण बॉम्बस्फोटामुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने पंतप्रधान फुमियो किशिदा यांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

वाकायामा शहरात पंतप्रधान फुमियो किशिदा जनतेला संबोधित करणार होते परंतु त्यांच्या भाषणापूर्वीच हा स्फोट झाला. बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर प्रचंड आवाज झाला. त्यामुळे लोकांमध्ये चांगलीच घबराट उडून चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या स्फोटानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करत आहेत.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जपानचे तत्कालीन पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सुद्धा ते अशा प्रकारेच जनतेला संबोधित करत होते त्यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने पाठीमागून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आता पुन्हा एकदा नव्या पंतप्रधानांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्यामुळे जपानमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.